लालबागचा राजाच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, नवसाची आणि मुखदर्शनाची रांग कधी बंद होणार?

in #mumbai2 years ago

राज्यातील तमाम गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन गुरुवारी रात्रीपासून बंद होणार आहे. येत्या ९ तारखेला अनंत चतुर्दशी आहे. यादिवशी लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) विसर्जनासाठी मंडपातून बाहेर निघेल. त्याची तयारी करण्यासाठी लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने उद्या मध्यरात्रीपासून गणपतीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या सकाळी ६ वाजता चरणस्पर्शची रांग आणि उद्या रात्री १२ वाजता मुख दर्शनाची रांग बंद करण्यात येईल. त्यामुळे आता भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे असेल तर अवघे काही तास उरले आहेत. (Anant Chaturdashi Visarjan ceremony 2022)

दोन वर्षाचं उट्ट काढणार म्हणत प्राजक्ता माळीनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन,सोबत होतं लाडकं कुटुंब

लालबागचा राजा हा मुंबईतील प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देश आणि परदेशातून भक्तगणlalbaugcha-raja-94055319.jpg