Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकी बनणार आईबाबा? 'कॉफी विथ करण'मध्ये गुड न्यूज देण्याची शक्यता

in #mumbai2 years ago

मुंबई, 19 ऑगस्ट- सध्या एकापाठोपाठ एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या प्रेग्नेन्सीची गोड बातमी देत आहेत. सोनम कपूर, आलिया भट्ट आणि बिपाशा बसूनंतर आता सर्वांचं लक्ष अभिनेत्री कतरिना कैफकडे लागलं आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाला जवळपास 6 महिने पूर्ण झाले आहेत. अशातच अभिनेत्री प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनाने या सर्व बातम्या अफवा असल्याचं सांगत फेटाळून लावल्या होत्या. त्यांनतर आता एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. पाहूया काय आहे हा रिपोर्ट.

कतरिना कैफ आपल्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सतत अभिनेत्री ओव्हरसाईज्ड ड्रेसमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अभिनेत्री प्रेग्नेंट असून बम्प लपवण्यासाठी हे करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. महिन्यामध्येसुद्धा असंच काहीसं झालं होतं. पण त्यांनतर अभिनेत्रीने या सर्व निव्वळ अफवा असल्याचं सांगत विषयाला पूर्णविराम लावला होता. पण तरीसुद्धा सतत अभिनेत्रीच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी सोनम कपूर, आलिया भट्ट आणि आता बिपाशा बसूनेसुद्धा आई बनणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं लक्ष कतरिना कैफकडे लागून आहे.