गणपतीच्या उत्सवात म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांची तुम्हाला माहिती आहे का?

in #mumbai2 years ago

![]( दिवस आले की तुमच्या व्हॉट्सअपवरती शुभेच्छांचे मेसेज किंवा इतर माहिती, फोटो धपधप पडू लागते.

कधीकधी त्यात विनोदही पाठवले जातात. गणपती आले आता तरी 'दीपकजोशी नमोस्तुते' म्हणू नका किंवा व 'फळीवर वंदना म्हणू नका' असे जोक्स पाठवले जातात.

एकेकाळी आरत्यांबरोबर वेगवेगळ्या मंडळांचे लोक पदं म्हणत असतं त्याला मेळ्यांची पदं असं म्हणत असत. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यावर लोक वेगवेगळ्या मेळ्यांमध्ये ही पदं म्हणत असत. या पदामध्ये इंग्रजविरोध लपलेला असे. उघड विरोध शक्य नसल्यामुळे अशा प्रकारे पदांच्या माध्यमातून हा विरोध लोकांपर्यंत पोहोचवला जाई.

गणपतीची मूर्ती, आरास, मोदक हा जसा चर्चेचा आणि ते सगळं आनंदाने पार पाडण्याचा विषय हे तसा एकत्र येऊन आरत्या म्हणणं हा सुद्धा एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

तुमच्यापैकी अनेक लोकांना लहानपणापासून या आरत्या म्हटल्याचं आणि त्या म्हणताना केलेली गंमत आठवत असेल. त्यात होत असलेल्या बदलांना स्वीकारून पुढे जाताना मूळ आरत्यांबदद्ल माहिती असणे आवश्यक आहे.

Sort:  

हम सभी को एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट कर एक दूसरे का सहयोग करना चाहिए तो फिर आज से ही यह नियम बना ले की हम सभी एक दूसरे की खबरों को लाइक कमेंट करेंगे। इसी से हमारा पावर बढ़ेगा प्लीज लाइक करे कमेंट करे।