धक्कादायक! शाळेत कॉपी करताना पकडलं, दहावीच्या विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचलंल

in #mumbai2 years ago

क्षुल्लक कारणावरून तरूणाने उचलंल टोकाच पाऊल, कुटूंबियांना बसला मोठा हादरा
November 9, 2022
बंगळूरू : गेल्या अनेक वर्षापासून तरूणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून हे तरूण आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलतं असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत दहावीच्या विद्यार्थ्यांला (Student) शाळेत (School) कॉपी करताना पकडल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर तरूणाने स्वत:च आयुष्य संपवल आहे. या घटनेने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.
बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या वर्गात (Student) शिकत असलेल्या तरूणाने आत्महत्या सारखे टोकाच पाऊल उचललं आहे. मोईन खान असे या विद्यार्थ्याचे (Student) नाव असून तो हेगडेनगर पब्लिक स्कूलमध्ये दहावीत शिकत होता. मोईन खान (16 वर्षीय) शाळेत परीक्षेला बसला होता. ही परीक्षा देत असताना तो कॉपी करताना पकडला गेला होता. सर्व वर्गासमोर त्याला अशाप्रकारे पकडल्यामुळे त्याला खुपच वाईट वाटले होते. या घटनेमुळे मोईन खानने आत्महत्या करण्याचा निर्णय़ घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे मोईनला (Student) शिक्षकाने वर्गाबाहेर बसण्यास सांगितले होते. मात्र, काही वेळानंतर त्याने सुरक्षारक्षकांना चकवा देत शाळेतून पळ काढला होता. त्यानंतर मोईन त्याच्या मित्राच्या घराजवळ असलेल्या थानिसांद्रा मेन रोडवरील बालाजी लेआउटमध्ये असलेल्या आरआर सिग्नेचर या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये गेला. आपल्या मित्राला भेटायला जाताना त्याने हे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स पाहिल्याचे सांगितले जाते. येथे तो 14 व्या मजल्यावरच्या टेरेसवर चढला आणि खाली उडी मारण्यासाठी काठावर उभा राहिला. त्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या काही लोकांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. मात्र या सर्वांच न ऐकता त्याने 14 व्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

दरम्यान याप्रकरणी मोईनच्या पालकांनी (Student parents) आपल्या मुलाच्या आत्महत्येसाठी शाळेच्या अधिकाऱ्यांवर छळ आणि निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे.