Nagpur | चार फुटांवरील मूर्तींचे कन्हान, कोलार नदी, कोराडीसह दहा ठिकाणी विसर्जन

in #mumbai2 years ago

नागपूर : महापालिकेने चार फुटाहून अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन शहराबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलार नदी, कन्हान नदी, कोराडी तलाव यासह प्रामुख्याने दहा ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनाच्या वेळी कुठली अनुचित घटना घडू नये, यासाठी १८९ जलतरण पटु तैनात करण्यात येणार आहे.

नागपूर शहरात ६३४ गणेश मंडळांनी श्री गणेशांची प्रतिस्थापना केली आहे. यात चार फुटांहून अधिक उंचीच्या ४११ तर २२३ मूर्ती चार फुटापेक्षा कमी उंचीच्या आहेत. ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणात मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळी अनुचित घटना घडू नये यासाठी जलतरण पटु तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अधिका-यांनी दिली.

Sort:  

Please like my post also