Petrol-Diesel Price Today: तेलाच्या किमती झाल्या अपडेट, इथे फक्त 84 रुपयांना मिळतंय पेट्रोल

in #mumbai2 years ago

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करण्यात आल्या. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपयांना उपलब्ध आहे, तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये (port blair) आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे.

देशातील कोणत्याही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये आहे.