मोठी बातमी! मुंबई-अहमदाबाद 'वंदे भारत' १ ऑक्टोबरपासून, असे आहेत तिकीट दर

in #mumbai2 years ago

या गाडीसाठी मुंबई-अहमदाबाद चेअर कारसाठी (सीसी) एक हजार ३८५ रुपये आणि एक्झिकेटिव्ह कारसाठी (ईसी) दोन हजार ५०५ रुपये असे तिकीट दर आहेत. आठवड्यातील सहा दिवस ही गाडी धावणार आहे. रविवारी देखभालीच्या कारणास्तव ती बंद असेल.

ही गाडी मुंबई सेंट्रलवरून सकाळी ६.१० वाजता रवाना होईल आणि गांधीनगर येथे दुपारी १२.३० मिनिटांनी पोहोचेल. गांधीनगरवरून परतीचा प्रवास दुपारी २.०५ मिनिटांनी सुरू होऊन रात्री ८.३० वाजता मुंबई सेंट्रल येथे पूर्ण होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क सुमीत ठाकूर यांनी दिली.