Session: “अरे हाड! ते काय…,” विरोधकांनी धक्काबुक्की केली का? विचारताच भरत गोगावले संतापले

in #mumbai2 years ago

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

नेमकं काय झालं?
आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खाऊन खाऊन माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.Bharat-Gogavle.jpg