मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कायदेत निकम यांची भेट; ‘नंदनवन’ झालेली भेट चर्चेत

in #mumbai2 years ago

कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी घेण्याचं जाहीर केलंय. आम्हीच मूळ शिवसेना, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला असला तरी, न्यायालयीन सुनावणी झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने कोणताही ठोस निर्णय घेऊ नये, असे निर्देश गुरुवारी न्यायालयाने दिले. या सुनावणीनंतर ही भेट झाल्याने कायदेशीर प्रक्रिया आणि या खटल्यासंदर्भात निकम यांच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ujjwal-nikam-meet-shinde.jpg