IND vs NZ T20 Live: रिषभ पंत पुन्हा एकदा ठरला फेल! अवघ्या 21 धावांवर भारताचे 3 फलंदाज परतले माघारी

in #mumbai2 years ago

नेपियर : भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातल्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. मात्र भारतीय गोलंदाजांचा वचपा काढून किवी संघाने शानदार पुनरागम केले आहे. न्यूझीलंडच्या संघाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर भारतासमोर मालिका खिशात घालण्यासाठी 161 धावांचे आव्हान असणार आहे. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली आहे