Mumbai : घरावर करणी केल्याचे भोंदूगिरी करत महिलेने घातला ज्येष्ठाला 15 लाखाला गंडा

in #mumbai2 years ago

डोंबिवली : तुमच्या घरावर करणी झाली असून त्यामुळे तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला. तुमचा देखील मृत्यू होऊ शकतो. या अदृश्य शक्तीपासून बचाव करण्यासाठी पूजा अर्चा करावी लागेल असे सांगत दोघा महिलांनी डोंबिवलीतील वसंत समर्थ ( वय 79) नागरिकास 15 लाखाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी घरकाम करणारी त्रिषा केळुसकर हिला अटक केली असून भोंदूगिरी करणारी मरियम हिचा पोलीस शोध घेत आहेत. पूजा अर्चा करण्यासाठी वसंत यांनी खर्च तर केला पण दान म्हणून मरियम हिने घरातील हार्मोनियम, घड्याळ, कपडे, कार या वस्तू दान स्वरूपात मागितल्या होत्या. मानपाडा पोलिसांनी 15 लाख 87 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
RECOMMENDED ARTICLES

गुजरातला लाभ मिळाला असेल तर तक्रार करण्याची गरज नाही - शरद पवार
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्याही माणसाला घराची ओढ असते, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदी-शहांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत शरद
5 hours ago

Fungal Infection: वारंवार ‘फंगल इन्फेक्शन’ होतंय? ही काळजी घ्या
फंगल इन्फेक्शन सहसा त्वचेवर, तोंडाजवळ, डोक्याच्या त्वचेवर, पायांना, मांडीवर होतात.
5 hours ago

केआरकेला हलक्यात घेण्याची चूक करू नका; नवे ट्विट, देशात सुरक्षित राहण्यासाठी...
KRK Latest News कमाल आर खान उपाख्य केआरकेने (KRK ) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. कुठे तर ट्विटरवर. ट्विटरवर (Tweet) जोरदार पुनरागमन केल्यानंतर केआरके आता राजकारणात येण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे केआरकेला हलक्यात घेण्याची चूक करू नका. केआरकेला राजकारणातील (Politics
5 hours ago
Political News : माजी आमदारांसह जुने शिवसैनिक शिंदे गटात!
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाअखेरीस नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर यांच्यासह अनेक सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १४) जुन्या शिवसैनिकांचा एक गट शिंदे गटात सह
5 hours ago
डोंबिवली पूर्वेतील खोणी पलावा येथील ऑरेलिया सोसायटी मध्ये वसंत राहतात. ते सेवानिवृत्त असून त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे तर मुलगा परदेशात नोकरीसाठी स्थायिक आहे. वसंत हे घरात एकटे असल्याचा फायदा त्यांच्या घरी घरकामासाठी येणाऱ्या त्रिषा हिने घेतला. त्रिषाने वसंत यांना तुमच्या घरावर करणी झाल्याचे सांगून आपण मरियम नावाच्या महिलेस ओळखतो. तिच्याकडे वेगळी शक्ती असून ती तुमची सर्व पिडा दूर करेल असे सांगितले.मरियम हिच्याशी भेट घालून दिल्यानंतर मरियमने वसंत यांना तुमच्या घरासमोरील खोलीवर करणी झाली असून ती तूमच्या घरावर उलटली असल्याचे सांगत तुमच्या पत्नीचा त्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे तुमचा देखील मृत्यू होऊ शकतो अशी भीती घालत त्यांना पूजा अर्चासाठी खर्च करण्यास सांगितले. त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना दृष्ट शक्ती नाहीशा केल्याचे सांगितले. त्याबदल्यात दान म्हणून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, म्युझिक सिस्टीम, घड्याळ, हार्मोनियम, कपडे, सुटकेस यांसह कार देखील दान मध्ये मागितली.त्यानंतर कार स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी आरटीओच्या पेपरवर वसंत यांची स्वाक्षरी घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी, पोलीस हवालदार काटकर, कदम, आहेर, पडवळ, हांडे यांच्या पथकाने प्रिया उर्फ त्रिषाचा शोध सुरू केला. तिला अटक केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तळोजा येथील आर्चिड सोसायटी येथे ठेवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी 15 लाखाचा मुद्देमाल कारसह हस्तगत केला आहे.esakal_new.png