Aditya Thackeray : मला पेंग्विन नावाचा अभिमान; विरोधकांना ठाकरेंचं खणखणीत उत्तर

in #mumbai2 years ago

Aditya_Thackeray.jpgवारंवार करण्यात येणाऱ्या पेंग्विन नावाच्या टिकेला अदित्य ठाकरेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पेंग्विन नावाचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या पेंग्विन टीकेमुळे जिजामाता उद्यान प्रॉफिटमध्ये आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी याकूब मेमनच्या कबरीवरून सुरू असलेल्या आरोपांबाबतही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, पेंग्विन नावाचा आणि त्यासाठी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही मुंबईसाठी काम केले आहे. आम्ही रोज बदली सरकार झालो नाही असे म्हणत राज्यात काही हिटलर शाही आली आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केली. राजकारण करावं पण आरोप किती खालच्या पातळीवर जाऊन कराव आणि काय आरोप करावे याला काही तरी मर्यादा आखणे गरजेचे आहे. विरोधकांकडून सध्या करण्यात येणारे आरोप कुणालाच न पटण्यासारखे आहेत. काही गोष्टी जनतेसमोर येणं गरजेचं असून, याकूब मेमला ज्यावेळी फाशी देण्यात आली त्यावेळी अतिरेकी म्हणून फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याच दफन मान सन्मानाने झाल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्याप्रमाणे लादेनला समुद्रातच दफन करण्यात आलं तसंच मेमनच्या बाबतीत का नाही झालं असा सवाल आदित्या ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ज्यावेळी मेमनची बॉडी संबंधित लोकांकडे देण्यात आली ते पूर्णपणे खासगी आहे. यात कुठेही महापालिकेचा संबंध येत नाही. बॉडी देताना कोणत्याही प्रकारची एनओसी घेतली गेली नसल्याचेही यावेळी आदित्य यांनी यावेळी सांगितले. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे.

Sort:  

Sir plz like my posts

I love you sir

Big fan your sir