करावे तसे भरावे... तेही जिथल्या तिथे! हा VIDEO पाहिल्यावर तुम्ही असंच म्हणाल

in #mumbai2 years ago

मुंबई : जुने लोक किंवा आपल्या घरातील वयोवृद्ध म्हणतात करावे तसे भरावे त्यामुळे कर्म चांगलं करा फळ चांगलं मिळेल. पण वाईट कर्माची फळ उशिरा का होईना आपल्याला भोगावी लागतात हे ऐकलं असेल. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे.

COMMERCIAL BREAK

SCROLL TO CONTINUE READING
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की बाईकवर बसून काही टवाळखोर तरुण जात आहे. या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाला टपली मारून खाली पाडायचं ठरवलं. पण वेळ आणि नशीब कसं असतं. त्यांना त्याच्या कर्माची फळ लगेच मिळाली.

तरुणांनी स्टंट करून रस्त्याने चालत जाणाऱ्या तरुणाला त्रास दिला. त्यानंतर त्रास देणारे तरुण बाईकवरून खाली कोसळले. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर हे ऐकलं असेल तेच प्रत्यक्षात या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

हा व्हिडीओ @karmanahora नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी विनाकारण त्रास दिल्याने असं घडल्याची कमेंट केली आहे. तर कर्माची फळ असं देखील म्हटलं आहे.