एक रुपयाही न देता Mahindra Scorpio-N खरेदी करा, जाणून घ्या नव्या स्किमबद्दल

in #mumbai2 years ago

Mahindra Scorpio-N Finance Scheme: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नुकतीच Scorpio-N SUV भारतात लाँच केली आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत रु. 11.99 लाख, एक्स-शोरूम आहे. मात्र, ही किंमत सुरुवातीच्या 25 हजार बुकिंगसाठी होती. त्यानंतरच्या बुकिंगच्या किमती अजून जाहीर केलेल्या नाहीत. गाडीसाठी बुकिंग 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाली होती. 30 मिनिटांत 1,00,000 बुकिंग झाले. एवढेच नाही तर पहिल्याच मिनिटात 25 हजार बुकिंग झाले. यासह महिंद्राच्या Scorpio-N एसयूव्हीने नवा विक्रम केला आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या मते, बुक केलेल्या नवीन स्कॉर्पियोची एकूण किंमत 2.3 अब्ज डॉलर म्हणजेच 18,000 कोटी रुपये होते. देशातील कोणत्याही वाहनाचे बुकिंग करण्याचा हा नवा विक्रम आहे. कंपनीने सांगितले की नवीन Scorpio-N ची डिलिव्हरी 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल आणि डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीने 20,000 नवीन Scorpios डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण, कमी बजेटमुळे तुम्ही अजून गाडी बुक केली नसेल, तर तुमच्यासाठी कंपनीनं एक आकर्षक फायनान्स स्कीम आणली आहे.