Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अजूनही आमदार? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण आमदारकीचं गूढ वाढलं

in #mumbai2 years ago

Uddhav-Thackeray-News-2.jpgमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या (Maharashtra Political Crisis) राजकारणात खळबळ उडाली होती. विश्वासदर्शक ठरावाआधीच उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिली देखील. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलेलं होतं. 29 जून रोजी केलेल्या या फेसबुक लाईव्हनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांची आमदारकी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय. कारण समोर आलेल्या एका यादीमध्ये उद्धव ठाकरे हे अजूनही आमदार असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे ही यादी विधिमंडळाच्या वेबसाईटवरही असून त्यात शिवसेनेच्या विधानसपरिषदेतील 12 आमदारांमध्ये (Shiv Sena MLA) उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आढळून आला आहे. जुलै 2022मध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जरी दिला असला, तरी त्यांनी अद्याप विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा खरंच दिला आहे की नाही? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

आश्चर्यकारक तारखा
8 जुलै 2022 ला विधान परिषदेच्या आमदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा उल्लेखही आढळून आला असून त्यात उद्धव ठाकरेंचं नाव दिसून आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Sort:  

सर जी हमारी भी खबर को लाइक करने का टाइम निकाले