Shah Rukh Khan : भावा, खरं खरं सांग किती कमावलेस...? अखेर शाहरुखनं सांगितली 'पठाण'ची खरी कमाई..

in #mumbai2 years ago

image.png
किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण'(Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तब्बल चार वर्षांनंतर ‘पठाण' या चित्रपटाद्वारे शाहरूखने वापसी केलीये आणि शाहरूखच्या या सिनेमांनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पठाण' रोज नवे विक्रम रचतोय. ११ दिवसांत चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. साहजिकच शाहरूख जाम खुश्श आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर '#AskSRK' सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.'#AskSRK' या सेशनमध्ये बादशाहने चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. यातला एक प्रश्न होता ‘पठाण'च्या कमाईबद्दलचा.