५.७ लाखांच्या कारसाठी शोरूम्समध्ये तुडुंब गर्दी, Baleno, Swift, Alto राहिल्या मागे

in #mumbai2 years ago

दिल्ली : Best Selling Car in India : भारतीय वाहन बाजारात मारुती सुझुकी कंपनीच्या कार्स सर्वात जास्त प्रमाणात विकल्या जातात. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या १० पैकी किमान ६ कार या मारुतीच्याच असतात. मारुतीची ही कामगिरी जुलै २०२२ मध्ये देखील कायम राहिली आहे. तसेच बाजारात मारुती कंपनीच्याच कार्समध्ये आपसात स्पर्धा सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून घेतलेत ते मारुतीच्या वॅगनआर या हॅचबॅक कारने. या वर्षातल्या पहिल्या ६ महिन्यात मारुती वॅगनआर ही देशात सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. कंपनीने जुलै २०२२ मध्ये या कारचे २२ हजार ५८८ युनिट्स विकले आहेत.

Subscribe to Notifications

या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात वॅगनआरचे एकूण १ लाख १३ हजार ४०७ युनिट्स विकले गेले आहेत. गेल्या वर्षातील वाहनांच्या विक्रीचे आकडे पाहता वॅगनआरच्या विक्रीत १९.५८ टक्के वाढ झाली आहे.

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.