भारतीय दिग्गजाच्या एकाच ट्वीटने देशभरात माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘तुझा आदर आहे, पण तू दलाल…’

in #mumbai2 years ago

image.png
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या ही असंख्य आहे. लहान मुलांपासून ते दिग्गज व्यक्तींपर्यंत सर्वजण या माध्यमाचा वापर करतात. यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. क्रिकेटपटू नेमकं काय ट्वीट करतात याकडे चाहत्यांचे बारीक लक्ष असते. जेव्हा खेळाडूंकडून एखादी चूक घडते, तेव्हा त्यांनी चाहत्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असेच काहीसे सध्या भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत घडले आहे. वीरेंद्र सेहवाग ट्वीट केल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. चला तर संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया…

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग ट्वीट (Virender Sehwag Tweet) केल्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या ट्वीटमुळे एकच खळबळ माजली आहे. सेहवागच्या या ट्वीटला गौतम अदानी (Gautam Adani) यांना दिलेला पाठिंबा म्हटले जात आहे. यामध्ये त्याने भारतीय बाजाराला निशाणा बनवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. सेहवागच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याला त्याचा सर्व