CWG 2022 : क्रिकेटमध्ये महिला संघाने रचला इतिहास; जिंकले रौप्यपदक

in #morning2 years ago

bhushan_esakal___2022_08_08T003731_189.jpgIndia Women vs Australia Women Final : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच क्रिकेटमध्ये पदक मिळाले. मात्र सुवर्णपदक मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता. त्याआधी 1998 मध्ये क्रिकेट हा कॉमनवेल्थ गेम्सचा भाग होता. त्यानंतर भारतीय पुरुष संघाला एकही पदक जिंकता आले नाही. एकदिवसीय विश्वचषक आणि टी-20 विश्वचषकापाठोपाठ कॉमनवेल्थ गेम्समध्येही ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले.कॉमनवेल्थ गेम्सच्या क्रिकेट फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक पटकावले आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारत सर्व गडी गमावून 152 धावा करता आल्या. पराभवानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.