MS Dhoni: धोनीच्या चित्रपटात 'नयनतारा', साऊथमध्ये फुल टू धिंगाणा!

in #mi2 years ago

New Films: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माही अर्थात महेंद्र सिंग धोनी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. दीड दशकांहून अधिक काळ ज्याच्या कॅप्टन्सीनं साऱ्या भारतवासीयांना आनंद दिला त्या धोनीच्या सेकंड इनिंगचे अनेकांनी स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या सिक्रेट मिशनची चर्चा होती. अखेर त्यानं आपण चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.WhatsApp_Image_2022_10_11_at_1_38_29_PM.jpeg