LPG Price : LPG गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांना मिळणार सिलिंडर

in #markit2 years ago

525855-lpg-cylinder-price-reduced-1-oct-2022.jpgLPG Price : दिवाळीपूर्वीच (diwali) ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवरात्रीमध्ये एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. आज 1 ऑक्टोबरपासून महानगरांमध्ये 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder) किमती कमी केल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वेबसाइटनुसार, या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति युनिट 37.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.