हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी

in #markit2 years ago

share-16642073473x2.jpg
मुंबई : US फेड बँकेनं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ केली. पुढच्या दोन महिन्यात पुन्हा एकदा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह आशियातील मार्केटवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजार कोसळलं आहे. डॉलर मजबूत झाला तर रुपयाने २० वर्षातील सगळे रेकॉर्ड मोडून निचांक गाठला.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. बेंचमार्क निर्देशांक 1.8 टक्क्यांनी घसरला. बँकिंग, फायनान्स, मेटल, रियल्टी क्षेत्रातील शेअर्स जोरदार आपटले. दरम्यान, कॉरपोरेट डेवलपमेंट आणि आउटलुकच्या आधारावर, ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने 5 शेअर्स घेण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमधून गुंतवणूकदारांना मोठा परतावा परत मिळू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

Gujarat Fluorochemicals- ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने प्रति शेअर टार्गेट प्राइस 4,270 रुपये जाऊ शकते. या शेअरचा आताचा भाव ३,५९१ रुपये आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 3,591 रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 679 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 19 टक्के परतावा मिळू शकतो.