Nashik : अस्वच्छतेमुळे फुलेनगरच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

in #malegaon2 years ago

Nashik_Esakal___2022_09_03T192746_614.pngपंचवटी (जि. नाशिक) : दाट लोकवस्तीच्या भाग, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, साठणारे पाणी, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, परिसरात सुटलेली दुर्गंधी अशा परिस्थितीने फुलेनगर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अशा अवस्थेत येथे लोक राहत आहेत. या परिसरातील स्वच्छता होत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत.