ईलॉन मस्कच्या Tesla चं वैभव ! CFO पदी निवड झालेले वैभव तनेजा कोण आहेत ?

in #maharatlast year

image.png
Tesla CFO Vaibhav Taneja : गुगलपासून मायक्रोसॉफ्टपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांची जबाबदारी भारतीय वंशाचे अधिकारी सांभाळत आहेत. अशात आता जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा मार्च २०१६ पासून टेस्लामध्ये काम करत आहेत. ते यापूर्वी सोलारसिटी कॉर्पोरेशन कंपनीत वित्त आणि खात्यांचे काम पाहत होते. मार्च २०१६ मध्ये टेस्लाने ही कंपनी ताब्यात घेतली आणि वैभव तनेजा टेस्लाचे कर्मचारी झाले. २०१७ मध्ये, कंपनीने त्यांना सहाय्यक कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून आणि मे २०१८ मध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर म्हणून पदोन्नती दिली. वैभव तनेजा हे मार्च २०१९ पासून टेस्लाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.
हेही वाचा: Tesla in India : टाटाचं टेन्शन वाढलं! भारतात स्वस्तात इलेक्ट्रिक कार बनवणार टेस्ला; मोदी-मस्क भेटीनंतर पुन्हा चर्चा सुरू

इलेक्ट्रीक कंपनी टेस्ला हीच्या चिफ फायनान्सियल ऑफीसर पदी नियुक्ती होण्यापूर्वी वैभव तनेजा याच कंपनीत चिफ अकाऊंटींग ऑफीसर म्हणून काम करत होते. त्यांना आता चिफ फायनान्सियल ऑफीसर म्हणून बढती देण्यात आली आहे. या अगोदर चिफ फायनान्सियल ऑफीसर पदी जॅचरी किर्खान होते. शिक्षण 45 वर्षीय वैभव तनेजा हे दिल्ली विद्यापीठाचे कॉमर्स ग्रॅज्यूएट आहेत. बीकॉम नंतर त्यांनी इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI) मधून चार्टर्ड अकाउंटिंगचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर सर्टिफाइड पब्लिक अकाउंटेंट (CPA) चा कोर्स पूर्ण केला.
हेही वाचा: Tesla CFO Vaibhav Taneja : टेस्लावर वैभवराज ! मस्कने लाडक्या कंपनीची जबाबदारी सोपवली भारतीय वंशाच्या तरुणाकडे

२०१६ साली टेस्ला कंपनीने सोलार सिटीचे संपादन केल्यावर वैभव तनेजा देखील ईलॉन मस्क च्या टीम मध्ये सामील झाले. पूर्वी ते टेस्लाचे चिफ अकाऊंटींग ऑफीसर म्हणून काम पाहात होते. साल 2021 मध्ये वैभव तनेजा यांची टेस्लाची इंडीयन शाखा टेस्ला इंडीया मोटर्स एण्ड एनर्जी प्रायवेट लिमिटेडचे संचालक म्हणून निवड झाली होती. तनेजा यांना अकाऊंटींगचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी अनेक टेक्नॉलॉजी, फायनान्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्यात काम केले आहे.टेस्ला कंपनीची भारतीय बाजारात उतरण्याची तयारीटेस्ला कंपनीने भारतीय बाजारात उतरण्याची तयारी जोमाने केली असता तनेजा यांना हे महत्वाचे पद सोपविले आहे.