सोशल मीडियावरचा DP बदला; 'हर घर तिरंगा'वरून पंतप्रधान मोदींचे आवाहन

in #maharatlast year

image.png
ताज्या
शहर

साप्ताहिक
मनोरंजन
देश
IPL

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो

Har Ghar Tiranga : सोशल मीडियावरचा DP बदला; 'हर घर तिरंगा'वरून पंतप्रधान मोदींचे आवाहन
Published on : 13 August 2023 11:04 AM

By
दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. येणारा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पाठिंबा देण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे. ट्वीटरवरून पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. "हर घर तिरंगा" या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या सोशल मीडिया खात्यांचा DP बदलू आणि या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊ ज्यामुळे आपला प्रिय देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील." असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन केलंय.
हेही वाचा: "मोठा हत्ती... मूर्ख"; तपासणी करायला शाळेत गेलेल्या अधिकाऱ्याने शिक्षकांना झापलं! Video आला समोर

दरम्यान, यावर्षी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन आहे. मागच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यात आला होता. तर प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावून त्याचे फोटो हर घर तिरंगाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनीही बदलला डीपीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डीपी काढून तिरंग्याचा फोटो अपडेट केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपला डीपी बदलून तिरंग्याचा डीपी ठेवण्याचे आवाहन केलंय. अनेक नेत्यांनीही आपले डीपी बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे.