Chandrayaan-3 : चांद्रमोहीम यशस्वी! आता सूर्य आणि शुक्रावर नजर; काय आहेत इस्रोच्या पुढील मोहिमा?

in #maharatlast year

image.png
ISRO Mission : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं लँडर उतरवून नवा इतिहास नोंदवला आहे. हे यश अर्थातच भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोचं आहे. मात्र, या मोहिमेनंतर इस्रो आराम करणार नाही. उलट इस्रोने आपल्या पुढच्या मोहिमेची तयारी देखील सुरू केली आहे.

अगदी दूरदृष्टी विचार करून इस्रोने आपल्या पुढच्या योजना आखल्या आहेत. चांद्रयानाच्या माध्यमातून चंद्राच्या लपलेल्या भागाचा अभ्यास इस्रो करणार आहे. तर, सूर्याचा आणि शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी देखील इस्रो उपग्रह पाठवणार आहे. सोबतच, मानवाला अंतराळात पाठवण्याची तयारी देखील इस्रोने सुरू केली आहे.
हेही वाचा: Chandrayaan-3 : ...आणि ते हसले! 'चांद्रयान-3'च्या यशस्वी लँडिंगनंतर के. सिवान झाले खुश; पाहा व्हिडिओ

आता सूर्यावर झेपइस्रोने आपल्या 'आदित्य एल-1' या मोहिमेची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. या माध्यमातून इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी आदित्य नावाचा हा उपग्रह पृथ्वीबाहेरील एल-1 या पॉइंटवर ठेवण्यात येईल. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.
गगनयानआतापर्यंत भारताने एकही अंतराळवीर अवकाशात पाठवलेला नाही. यासाठीच, इस्रो गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्वतः अवकाशात मानव पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. ही मोहीम 2024 साली पार पाडण्याचं इस्रोचं लक्ष्य आहे.
हेही वाचा: Chandrayaan-3 : 'अखंड भारतासाठी अभिमानाचा क्षण!' भारताने इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार

मंगळयान अन् शुक्रयानपहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारं इस्रो आणखी एका मंगळ मोहिमेची तयारी करत आहे. सोबतच, शुक्र ग्रहासाठी देखील एक मोहीम राबवण्यात येणार आहे. अर्थात, या दोन्ही मोहिमांबद्दल सध्या अधिक माहिती उपलब्ध नाही.