मोदींचा पुणे दौरा कसा होता? काय घडल्या घडामोडी, वाचा सविस्तर

in #maharatlast year

image.png
एकीकडे महाराष्ट्रात विकास होतोय तर दुसरीकडे शेजारचं राज्य कर्नाटकात काय होतंय ते समोर येत आहे. बंगळूरू मोठं आयटी हब आणि ग्लोबल इन्व्हेस्टर सेंटर आहे. यावेळी कर्नाटकाचा गतीने विकास होणं अपेक्षित होतं परंतु सरकार बदललं आणि जनतेचं नुकसान झालं.

आपल्याला भारतातील शहरात राहणाऱ्या लोकांचा जीवनस्तर उंचवायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टला अधुनिकतेची जोड दिलीच पाहिजे. देशातील शहरात मेट्रो सेवेचा विस्तार केला जात आहे. फ्लायओव्हर बांधले जात आहेत. २०१४ पर्यंत २५० किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. आता देशात हे नेटवर्क ८०० किमीहूनही जास्त झालं आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात मेट्रो सेवा होती आता देशात २० शहरात मेट्रो नेटवर्क आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्ये देखील मेट्रो नेटवर्कचा विस्तार होत आहे. पुण्यात प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा आहे. पुण्यासारख्या आपल्या शहरात क्वालिटी ऑफ लाइफ सुधारण्यासाठी आपलं सरकार सतत काम करत आहे. येथे येण्यापूर्वी पुण्याच्या आणखी एका सेक्शनचं लोकार्पण झालं आहे. पुणे मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा मला त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मिळाली होती. या पाच वर्षात येते तब्बल २४ किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरू झालं आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आज पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं. यासोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारादरम्यान वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो सेवेचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे. तसेच यासोबत पंतप्रधान आवास योजनेचं देखील लोकार्पण यावेळी करण्यात आलं