राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट

in #maharatlast year

image.png
राज्यात मागील काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात ओढे, नाले, नद्या दुधडी भरून वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र राज्यात मागील 3-4 दिवस पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला होता. आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.

दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा: Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती! पुन्हा कधी मुसळधार जाणून घ्या हवामानाचा विभागाचा अंदाज

आज पुण्यातही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज पुण्यासोबत रायगड, रत्नागिरी, आणि सातारा या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज मुंबई आणि ठाण्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.जुलै महिन्यात मुसळधार कोसळल्यानंतर आता पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीस मात्र दडी मारल्याचं चित्र आहे. पुढील दोन दिवसांसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यांना रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. पण, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून त्या भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तुरळक सरी बरसतील असंही सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा: Weather Update: राज्यातील पावसाचा जोर ओसरला! मुंबई पुण्यात काय असणार परिस्थिती?

तर 2 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार आहे.
हेही वाचा: Koyna Dam Update : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी; धरणात किती आहे साठा? महाबळेश्वरला 99 मिलिमीटर पावसाची नोंद