मणिपुरात पुन्हा भडका! आक्रमक जमावानं पोलिस ठाण्यावर हल्ला करत लुटला

in #maharatlast year

image.png
Saturday, August 5, 2023
AMP

ताज्या
शहर

साप्ताहिक
मनोरंजन
देश
IPL

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो

मणिपुरात पुन्हा भडका! आक्रमक जमावानं पोलिस ठाण्यावर हल्ला करत लुटला 235 रायफल, 21 पिस्तूल, 9 हजार गोळ्यांसह शस्त्रसाठा
Published on : 5 August 2023 8:20 AM

By
सकाळ डिजिटल टीम
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळं आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manipur Violence : मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत.

बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी (4 ऑगस्ट) रात्री मेईतेई समुदायाच्या (Meitei community) तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे.
हेही वाचा: Loksabha Election News: राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी घोषणा

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा (Manipur Rifles) एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. एवढंच नाही तर जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला.

हेही वाचा: Loksabha Election : 'कल्याण' जिंकण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; खासदार शिंदेंचं वाढणार टेन्शन, 'हा' बडा नेता होणार सक्रीय!

जमावानं 235 असॉल्ट रायफल, 21 सब-मशीन गन, 16 पिस्तूल, 9,000 गोळ्या आणि 124 हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कुकी गट (Kuki community), इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने हिंसाचारात बळी पडलेल्या 35 जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे.3 ऑगस्ट रोजी दुसर्‍या घटनेत बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगकचाओ युनिटमध्ये शेकडो लोक जमले होते. यानंतर हल्लेखोरांना हाताळण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये 347 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मणिपूरमधील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
हेही वाचा: मोठी बातमी! जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी जोरदार चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद, शोध मोहीम सुरूच

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळं आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, 50 हजारांहून अधिक लोकांना छावणीत राहण्यास आणि राज्य सोडण्यास भाग पाडलं जात आहे. अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत.