: मंत्रालयात रोज ऐकवले जाणार शिवरायांचे विचार! या मंत्र्याने सुरू केला उपक्रम

in #maharatlast year

image.png
आता रोज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकवले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकल्यानंतरच मंत्रालयातील कामकाजाची सुरुवात केली जाणार आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून राज्य शासनाने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा: Corruption : निवृत्त स्टोअर कीपर निघाला कोट्यवधी रुपयांचा मालक ; आलिशान घर पाहून लोकायुक्त टीमला बसला धक्का..

छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्त हा उपक्रम वर्षभर मंत्रालयामध्ये राबवला जाणार आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांचे विचार ऐकवले जाणार असून त्यानंतरच मंत्रालयातील कामाला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा: Uddhav Thackeray: ठाकरे गटात पुन्हा मोठा बंड होणार? संभाजीनगरमध्ये पार पडली गुप्त बैठक

कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा वाजून 45 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ऐकवले जाणार आहेत. यातून या सर्वांना प्रेरणा मिळेल असे या मागचे उद्दिष्ट आहे. रोज सकाळी दोन ते तीन मिनिटांसाठी शिवाजी महाराजांचे विचार या सर्वांना ऐकवले जाणार आहेत