राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'राज्यपालांचं' धोतर फाडलं, पुण्यात अनोखं आंदोलन,

in #maharastra2 years ago

पुणे, 21 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताज्या वक्तव्याने राज्यभरात वादंग उठलाय. 'छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत', असं राज्यपालांनी म्हटलं होतं. यावरुन विरोधी पक्षांनी भाजप आणि राज्यपालांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात अनोखे आंदोलन केले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्याचा निशेष म्हणी पुण्यात आजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. यात डमी भगतसिंग कोश्यारींचं धोतर फाडून निषेध व्यक्त करण्यात आल्या. तसेच यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात निषेधही व्यक्त करण्यात आला.image-2022-11-21T122833.889.webp