अकोट बाजार समितीपांढऱ्या सोन्याचा बाजार स्थिरावलाआवक घटली

in #maharastra2 years ago

अकोट बाजार समिती : सरकी व खाद्यतेलाच्या दरात सुधारणा झाल्याचा फायदा कापूस बाजाराला मिळत असल्याचे दिसून येत आहे. गत आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. अकोट बाजार समितीत बुधवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी तर कापसाने १० हजार रुपयांचा टप्पासुद्धा ओलांडला होता. मात्र, आता पांढऱ्या सोन्याचा स्थिरावला असून, आवकही कमी झाल्याचे चित्र आहे. बाजार कापसाला ८ हजार ८०० ते ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
कापसाचा हंगाम दि. १ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. परतीच्या पावसामुळे हंगाम लांबला आहे. दिवाळीपर्यंत कापसाचे दर दबावात होते. हंगामाच्या प्रारंभी काही दिवस कापसाचे बाजारभाव प्रति क्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपयांच्या घरात होते. त्यानंतर कापसाच्या दरात तेजी आली.
तेव्हापासून कापसाचे दर स्थिरावल्याचे चित्र आहे. दिवाळी सणानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्याने देशातील कापूस बाजाराला आधार मिळाला. कापसाच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली होते.
आजही काही बाजारांमध्ये कापसाचे दर क्विंटलमागं १०० रुपयाने वाढले होते. तर अनेक बाजारांमधील दर स्थिर होते. कापसाच्या दरातील वाढ पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील महिना- दोन महिन्यांमध्ये कापसाला सरासरी ९ ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहेत.cotton-750x375.jpg