Aamir Khan च्या घरावर ED चा छापा, 17 कोटी रुपये केले जप्त

ED raids Aamir Khan’s house : कोलकात्यात ईडीने (Enforcement Directorate) मोठी कारवाई केली आहे. कोलकातामधला व्यापारी आमिर खानच्या ( Businessman Aamri Khan) घरात ईडीला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. व्यापारी आमिर खान याच्या गार्डन रीच निवासस्थानी ईडीने काल सकाळी छापा टाकला. पाच ट्रंकमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पैशांची मोजणी सुरु केली आणि रात्री उशीरापर्यंत मोजणी सुरुच होती. ईडी अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती