Aai Kuthe Kay Karte: अखेर आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती देणार प्रेमाची कबुली!

मुंबई, 18 नोव्हेंबर : अनेक मराठी मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाच खास घर केलं आहे. यातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी मोठा क्रेझ पहायला मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच 'आई कुठे काय करते' मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेचा 20 नोव्हेंबरला महाएपिसोड पहायला मिळणार आहे. या महाभागात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे महाएपिसोडमध्ये अरुंधती तिचं उत्तर आशुतोषला सांगणार आहे. अखेर अरुंधती आपल्या प्रेमाची कबुली आशुतोषला देणार आहे. त्यामुळे अरुधंतीचं उत्तर काय असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. प्रोमो व्हिडीओ समोर आल्यापासून प्रेक्षक अनेक तर्क-वितर्क लावत असलेले पहायला मिळत आहे.समोर आलेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की, यश अरुंधतीला तिच्या आयुष्याविषयी बोलत आहे. यश अरुंधतीला म्हणतो, आई तू तुझं स्वतःचं आमच्यासाठी होल्ड वर ठेवतेस तसंच तुझ्यासाठी कोणीतरी त्याचं आयुष्य होल्ड वर ठेवलं आहे. पण आमच्यासाठी तू तुझं आयुष्य थांबवण्याची गरज नाही. यावर अरुंधती म्हणते मी यावर विचार केलाय यश. मी आशुतोषच्या वाढदिवशी माझं उत्तर त्याला सांगणार आहे.दरम्यान, येत्या भागात काय घडणार? अरुंधतीचं उत्तर काय असणार? ती आशुतोषला काय बोलणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 20 नोव्हेंबर अरुंधतीचं उत्तर समोर येणार आहे. दुपारी 1 ते संध्याकाळी 7 पर्यंत होणाऱ्या महाएपिसोडमध्ये आपल्याला हे सगळं पहायला मिळणार आहे. अरुंधतीच्या उत्तराने मलिकेत काय नवं वळण येणार हेही पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका घरघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेतील सगळी पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. खास करुन अरुंधतीचं. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षक आवर्जुन बघत असतात.Untitled-design-2022-11-18T155857.572.jpg