रश्मिका मंदाना- विजय देवरकोंडानं लपून छपून केलं लग्न? व्हायरल फोटोंमागंचं काय आहे सत्य

मुंबई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) आणि विजय देवरकोंडा (vijay deverakonda) या दोघांचं अफेअर असल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. त्या दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहतेदेखील खूप आनंदित होतात. परंतु हे दोघंजण सार्वजनिक ठिकाणी एकमेकांबरोबर फारसे दिसत नाहीत. अशातच सोशल मीडियावर त्या दोघांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्या फोटोमध्ये त्यांनी नवदांपत्याची वेशभूषा केली आहे. हा फोटो पाहून दोघांनी गपचूप लग्न केल्याची चर्चा होऊ लागली आहे. हा फोटो पाहून त्यांचे चाहते कमालीचे आनंदित झाले आहेत.चाहत्यांना रश्मिका आणि विजय यांची जोडी खूप आवडते. त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जोडीदार म्हणून निवडावं अशी त्यांच्या चाहत्यांची तीव्र इच्छा आहे. त्यातच सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामुळे त्या दोघांनी लग्न केल्याची चर्चा सुरू झाली. या दोघांना असं एकत्र पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर काहींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. परंतु काही चाणाक्ष चाहत्यांनी या फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला.काही हुशार चाहत्यांनी या फोटोमागचं सत्य जाणून घेतलं असता हा फोटो मॉर्फ केल्याचं समोर आलं आहे. एका चाहत्यानंच या दोघांचा फोटो फोटोशॉपमध्ये एकत्र आणून तो एडिट केला आहे. हा फोटो जरी खोटा असला तरी त्या मागचं सत्य समोर येईपर्यंत अनेक चाहत्यांनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. इतकंच नाही तर आता खऱ्या आयुष्यतही या दोघांनी एकत्र यावं अशी इच्छाही व्यक्त केली.vijay-rashmika-95691179.jpg