शिवसेनेची ऑफर, संभाजीराजे भूमिकेवर ठाम, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

in #maharashtra2 years ago

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला दावा सांगणारे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. राज्यसभेसाठीच्या सहाव्या जागेचा तिढा निर्माण झाल्यानंतर तसेच शिवसेनेने दुसरा उमेदवार देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर संभाजीराजेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही महत्त्वपूर्ण भेट होत आहे. या भेटीत राज्यसभेसाठी शिवसेनेने सहकार्य करावं, असं आवाहन संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना करतील.maharashtra-times (1).jpg