प्रभात’चे ‘स्मरत बलिदानम्’ अव्वल ठरल्याची गोष्ट!

in #maharashtra2 years ago

‘स्वातंत्र्यमूल्य... सकाळचं कोवळं ऊनभारतीय मनाचा सच्चा नि समंजस भावदार उघडत नाही, तोवर बाहेर तिष्ठत राहणाराउघडलं; की, सगळीकडे लख्ख प्रकाश!आपणही असेच... आपलं स्वातंत्र्य वाटणारं.,स्वातंत्र्याच्या स्मृतीचं मोठेपण... देशाला जागविणारं!’प्रा. डॉ. सुहास उगले स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी नव्या पिढीतही राहावी यासाठी ‘प्रभात’मधील संस्कृत शिक्षक मधुकर आटोळे यांनी संस्कृत बालनाट्य ‘स्मरत बलिदानम्’चं नाट्यलेखन केलं. नाटकाची थीम होती... जालियनवाला बाग हत्याकांड! भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा बिंदू असलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेला १०३ वर्षे झालीत. इंग्रजांच्या राजवटीचा हा निर्घृणतेचा कळसच होता. हा स्वातंत्र्याच्या ट्रिगर पॉईंट ठरला. भारतातील ब्रिटिश राजच्या अखेरीची ही सुरुवात ठरली.Tiranga.jpg