नुकसान भरपाईबाबत अधिसूचना जारी

खरिप हंगाम २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले होते. याबाबत कृषी विभागाकडून सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), तूर व ज्वारी या चार पिकांचे ६० ते ६८ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के भरपाईसाठी (Crop Damage Compensation) जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी मंगळवारी (ता.१३) अधिसूचना जारी करून विमा कंपनीसह शासनाला कळविले आहे.
जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात सात लाख शेतकऱ्यांचे सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला कळविला होता. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ७१८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु पीकविमा कंपनीकडून नुकसानीबाबत अग्रिम देण्याची मागणी जोर धरु लागली होती. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यामार्फत विमा कंपनीच्या माध्यमातून मंडळनिहाय नुकसानीचा अहवाल मागवून घेतला.
भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम खात्यात जमा करावी’

यात पीकविमा योजनेतंर्गत खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांचे उत्पादन हे त्या पिकांच्या सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीला ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या अधिसूचित पिकांकरिता महसूल मंडळातील सर्व पिकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.
images (14).jpeg