आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल कुणी टाकले? टॉप 5 मध्ये तीन भारतीय

in #kapil2 years ago

3307dc757657d1117a35bae4c2be2ebc_original.jpgMost Dot Balls in IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडणाऱ्या या स्पर्धेत गोलंदाजांनीही करिश्मा दाखवलाय. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाडणारे फलंदाज मधल्या षटकात सावध पवित्रा घेत धावा करण्याचा प्रयत्न करतात. अशामध्ये डॉट बॉलचं प्रमाण जास्त आसते. पाहूयात... आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डॉटबॉल टाकणाऱ्या पाच गोलंदाजाबद्दल

हरभजन सिंह
भज्जीने क्रिकेटच्या सर्व प्रकरातून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉटबॉल फेकण्याचा विक्रम हरभजनच्या नावावर आहे. भज्जीने आयपीएलमध्ये 160 डावात गोलंदाजी केली आहे. यामध्ये भज्जीने 1268 डॉट बॉल फेकले आहेत. भज्जीच्या नावावर 150 विकेट आहत. भज्जीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून