तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना…”; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

in #kapil2 years ago

CM-uddhav-ajit-pawar.jpgपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या करोना आढावा बैठकीत उपस्थित केलेला इंधन दरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीवरुन भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांवर निशाणा साधलाय. केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये इंधनावरील कर कमी केले पण काही राज्यांनी केले नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ अशा काही भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांचा थेट उल्लेख केला. यावरुनच आता राज्यामध्येही आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यानंतर जीएसटीचा वाटा केंद्राने अद्याप दिलेला नसल्याची टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर