LMOTY 2022: ‘ताज’ची क्रोकरी, स्टीलच्या कपातली कॉफी, आणि गणितात शंभरपैकी शंभर!

in #india2 years ago

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘तुम्ही त्यांच्या घरी जाल, तर तुमचे आदरातिथ्य ताजच्या श्रीमंती क्रोकरीतून वाफाळती कॉफी देऊन होईल, पण त्या घराच्या आणि ‘टाटां’च्या बॉससाठी त्यांची कॉफी मात्र पारंपरिक स्टीलच्या कपातूनच येईल’ - टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांच्या साधेपणाविषयीचा अनुभव लोकमतचे संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांनी सांगितला आणि अवघे सभागृह या दिग्गज व्यक्तीच्या सुसंस्कृत साधेपणाने भारावून गेले. एन. चंद्रा यांच्याशी झालेल्या गप्पांमधून मग त्यांचा हा साधेपणा सतत डोकावत राहिला.एन. चंद्रा यांचे अवघे कुटुंब हा भारतीय उद्योगविश्वातला एक विलक्षण आदराचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्याच्या एका छोट्या गावातले हे तीन बंधू. एन. चंद्रसेकरन हे टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष. त्यांचे बंधू एन. गणपती सुब्रमणियम टीसीएसचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि तिसरे बंधू एन. श्रीनिवासन हे मुरुगप्पा या बड्या उद्योगसमूहाचे वित्त संचालक. जमशेटजी टाटा, रतन टाटा यांनी जी जबाबदारी निभावली; त्याच खुर्चीवर बसताना हे ‘टेक ओव्हर’ होत असताना तुमच्या भावना काय होत्या?- असे ॠषी दर्डा यांनी विचारले तेव्हा ते नम्रपणे म्हणाले, अशा उत्तुंग व्यक्तींचे काम तुम्हाला करायला मिळते म्हणजे तुम्ही त्यांच्या खुर्चीवर बसता असे नसते... (यू आर नॉट फिलिंग देअर शूज)... मी कधीच याकडे ‘टेक ओव्हर’ असे पाहिले नाही. मला एक काम दिलेले आहे आणि ते उत्तम प्रकारे करायचे आहे, एवढाच विचार मी केला, करतो!’aod9cyigkbdcadc_202210896142.jpg