Dhanteras Dhamaka Offer : Airtel पेमेंट बँक फक्त 1 रुपयांत देतेय सोनं, ग्राहकांची होणार चांदी!

in #india2 years ago

आता दिवाळी तोंडावर आली आहे. धनत्रयोदशी हा चार-पाच दिवस चालणाऱ्या दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस असतो. यादिवशी सोन्याची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. महत्वाचे म्हणजे, धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फिजिकल सोने सर्वाधिक खरेदी केले जाते. मात्र, डिजिटल सोने खरेदी करण्याची आणि गुंतवणूक करण्याची संधीही आहे. मात्र, डिजिटल सोने म्हणजे काय? या संदर्भात फार कमी लोकांना माहिती आहे. डिजिटल गोल्ड हे ऑनलाइन पद्धतीने खरेदी केले जाते.ग्राहक 24 कॅरेट हॉलमार्कचे सोने 1 रुपयांपेक्षाही कमी दरात खरेदी अथवा विक्री करू शकतात. काही विक्रेते तर होम डिलिव्हरीचाही पर्याय देतात. तसेच, जर ग्राहक खरेदी केलेले सोने आपल्याकडेच ठेऊ इच्छित असतील तर तसा पर्यायही आहे. पेमेंट केल्यानंतर, खरेदी करणाऱ्यांना पावतीही मिळते. तसेच, ही सर्व्हीस प्रोवायडरबरोबरच ग्राहकांच्या व्हॉलेट बॅलेन्समध्येही दिसते. हे सोने ग्राहक कुठल्याही वेळी लाइव्ह मार्केट रेट प्रमाणे रुपये अथवा ग्रॅममध्ये विकू शकतात.

ही कंपनी देतेय डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा पर्याय - एअरटेल पेमेंट्स बँक डिजिटल गोल्ड प्रोव्हायडर SafeGold सोबत भागीदारीत DigiGold ऑफर करते. डिजीगोल्डसह, एयरटेल पेमेंट्स बँकचे ग्राहक एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमाने दो मिनिटांच्या आत 24K सोन्यात गुंतवणूक करू शकतात. ग्राहकांनी खरेदी केलेले हे सोने SafeGold द्वारे कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय सुरक्षित ठेवले जाते. एवढेच नाही, तर ज्या लोकांचे एअरटेल पेमेंट्स बँकेत बचत खाते आहे, असे ग्राहक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही डिजीगोल्ड भेट स्वरुपात देऊ शकतात. विशेष म्हणजे, ग्राहक 1 रुपयांतही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकतात.

clipbofard07afbr_202210896083.jpg