मुंबई एअरपोर्टवर व्यक्तीच्या बेल्टवर आला संशय, तपास करताच पोलीस हडबडले;.

in #india2 years ago

मुंबई : तस्करीसाठी स्मगलर काय करतील याचा काही भरोसा नाही. असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत समोर आला आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी तस्कराकडून तब्बल ५.२० कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. विशेष म्हणजे कमरेला जोडलेल्या एखा खास बेल्टमध्ये आरोपीने हे सोने लपवून आणल्याची माहिती आहे. दुसरीकडे, गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क पथक मुंबई विमानतळावर आधीच अलर्टवर होते. या माहितीच्या आधारे पथकाने तपास आणि शोध सुरू केला. यावेळी आरोपींकडून ५ कोटी २० लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारीही अवाक् झालेmumbai-police-news-today-94848863.png