पुण्यात मुसळधार! येत्या 48 तासात पुन्हा धो धो बरसणार? परतीच्या पावसाबाबतही महत्त्वाची अपडेट

in #india2 years ago

अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : पुण्यात शुक्रवारी अवघ्या दोन तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची (Pune Rains) नोंद झाली. या पावसाने पुणे शहर (Pune News) जलमय झालं. दोन तासांत तब्बल 78 मिलीमीटर इतका पाऊस पुण्यात झाला. दरम्यान, आता येत्या 48 तासांतही मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर पुणे शहरासह जिल्ह्यातही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज उद्यासाठी येलो अलर्ट

आज आणि उद्या पुण्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील सगळेच मुख्य रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

Rain-5.jpg