नारायणगावातील कॅफेत अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील चाळे; कॅफे चालकांवर गुन्हा दाखल

in #india2 years ago

नारायणगाव - दै. सकाळ मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन पोलिसांनी नारायणगाव येथील दोन कॅफेची अचानक तपासणी केली. तपासणीत कॅफे मधील पडदे लावून पार्टीशन केलेल्या जागेत बारावी इयत्तेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले-मुली एकांतात बसून असभ्य वर्तन व अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले.या प्रकरणी दोन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.या प्रकरणी वारुळवाडी येथील कॉलेज रोड लगत असलेल्या मुनलाईट कॅफेचे मालक विशाल संदिप पवार (वय २०, राहणार पाटे- खैरे मळा, नारायणगाव) व नारायणगाव शहरातील कॅफे क्रिम लक्ष्मी थिएटरचे मालक समर्थ कालीदास सरवदे (वय २१, राहणार खोडदरोड, नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे1623741911_crime.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻