गुंतवणूकदार हवालदिल! ३ रुपयावर घसरला शेअर, १० महिन्यांत १ लाखाचे झाले फक्त...

in #india2 years ago

मुंबई : शेअर बाजारासाठी यंदाचा आठवडा काही विशेष सिद्ध झाला नाही. बहुतेक समभागांनी त्यांच्या भागधारकांचे नुकसान केले. मात्र काही समभागांनी जबरदस्त परतावा देखील दिला आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा समभागाबद्दल सांगत आहोत, ज्याला २०२२ या वर्षात आतापर्यंत ९२% पेक्षा जास्त तोटा सहा करावा लागला आहे. इयर टू डेट (YTD) मध्ये हा शेअर ५० रुपयांवरून ३.६० रुपयांपर्यंत घसरला आहे. हा स्टॉक बीएसई-एनएसई वर १० ऑक्टोबर रोजी शेवटचा ट्रेड झाला होता तर सध्या त्याचा व्यवहार बंद आहे. हा शेअर फ्युचर ग्रुपच्या फ्युचर रिटेल कंपनीचा आहे.गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
फ्युचर ग्रुपचा हा शेअर यंदा सातत्याने घसरत आहे. यामुळे ज्या भागधारकांनी आतापर्यंत त्यात आपली गुंतवणूक कायम ठेवली आहे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी शेअर एनएसईवर ५० रुपयांवर व्यवहार करत होता पण आता १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत ९२% पेक्षा अधिक अंकांनी घसरून ३.६० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, त्यांच्या एका लाखाचे केवळ ७,२०० रुपयांवर आले आहेत.stock-market-future-retail-share-price-94880319.jpg