Ratan Tata: रतन टाटा भावूक झाले, एकटेपणा अन् म्हातारपणाचे दु:खच सांगितले

in #india2 years ago

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या उपस्थितीत मंगळवारी 'गुडफेलोज' नावाचे स्टार्ट-अप लाँच करण्यात आले. वयस्क मंडळींना एक अर्थपूर्ण कम्पॅनियनशीप देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या नव्या कल्पनेच्या स्टार्ट-अपला रतन टाटा यांनी अर्थसहाय्य देऊन त्यात गुंतवणूकही केली. या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना रतन टाटा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. रतन टाटांनी एकटेपणाचं दु:ख आणि वेदना बोलून दाखवल्या, तुम्ही जेव्हा म्हातारे होता तेव्हा कसं वाटतं, असे म्हणत एकटेपणावर भाष्य केलं.