विंचवाचं विष 80 कोटी रुपयांना 1 लीटर, पण या विषाचं करतात तरी काय?

in #india2 years ago

![](मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या विंचवांपासून काढण्यात आलेल्या विषामध्ये मार्गाटॉक्सिन नावाचा एक घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये नवीन पेशी तयार करायला मदत करतो आणि तो हृदयाच्या बायपास सर्जरीमध्ये वापरला जातो.

हे विंचू पाच सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटरपर्यंत वाढतात. त्यांचं विष हे जीवघेणं नसलं तरी या विंचवाच्या दंशामुळे वेदना होते तसंच सूज येते आणि दंश झालेल्या जागेवर खाजही सुटते.

युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधील प्राध्यापक आणि विंचू दंशाचे अभ्यासक डेव्हिड बीच सांगतात की, हे विष अविश्वसनीयरित्या परिणामकारक आहे.