भारताची प्लेइंग इलेव्हन ‘फुटली’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय

in #india2 years ago

भारताची प्लेइंग इलेव्हन ‘फुटली’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय संघ?
भारताची प्लेइंग इलेव्हन 'फुटली', पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी बीसीसीआयने जाहीर केलाय संघ?
By Shweta Chidamalwad 9 hours Ago

KL-Rahul-Rohit-Sharma
Photo Courtesy: Twitter/BCCI

WhatsappFacebookTwitterTelegram

भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिद्वंद्वी संघात रविवारी (२८ ऑगस्ट) आशिया चषक २०२२ मधील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कारण याच प्लेइंग इलेव्हनसह भारत ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकातही खेळेल अशी अपेक्षा आहे.

परंतु पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) बहुप्रतिक्षित सामन्याच्या २ दिवसांपूर्वीच बीसीसीआयने (BCCI) भारताची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये (BCCI Hinted India’s Playing Xi) अशी चर्चा रंगली आहे.

बीसीसीआयने शुक्रवारी (२६ ऑगस्ट) भारतीय संघाच्या दुबईत सुरू असलेल्या नेट सेशनमधील काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय संघाचा सराव सुरू आहे आणि आमचे कॅमेरा त्यांचे फोटो क्लिक करत आहे.’

या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एकूण १० फोटो आहेत. ज्यावरून चाहते असा अंदाज व्यक्त करत आहेत की, या पोस्टद्वारे बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल संकेत दिले आहेत. या पोस्टमध्ये, उपकर्णधार केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, यष्टीरक्षक रिषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग आहेत.