NASA: आज नासा 'Artemis I' करणार लाँच; पहिल्या प्रयत्नात आला होता अडथळा

in #india2 years ago

नासा आज पुन्हा एकदा नव्या मोहिमेच्या तयारीत आहे. आज (शनिवारी) नासाकडून नवीन चंद्रयान लाँच करण्यात येणार आहे. 'आर्टेमिस आय' असं नासाच्या या चंद्रयान मोहिमेचं नाव आहे. नासाकडून आज शक्तिशाली चंद्रयान लाँच केले जाणार आहे. फ्लोरिडातील कॅनिडी स्पेस सेंटर येथून आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी Artemis I हे रॉकेट लाँच करण्यात येणार आहे.

Artemis I हे रॉकेट याआधीच लाँच करण्यात येणार होते. परंतु, यामध्ये तांत्रिक अडथळा आल्यामुळे या रॉकेटचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आले होते. Artemis I या रॉकेटमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरु होतं. आज दुसऱ्यांदा हे रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नासाकडून यासाठीची तयारी सुरु केली आहे. यावेळी हे रॉकेट लाँच यशस्वी होईल अशी आशा नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहेesakal_new__13_ (1).jpg